IGTR द्वारे औद्योगिक कौशल्य विकास प्रशिक्षण योजना FAQs
१. योजनेच्या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रे/दस्तऐवज आवश्यक आहेत?
जातीचा दाखला, ज्या आर्थिक वर्षातील योजना आहे त्या वर्षाचा कौटुंबिक एकूण उत्पन्नाचा तहसीलदार अथवा प्राधिकृत शासकीय अधिकारी यांचा दाखला, अधिवास दाखला, आधार व पॅनकार्डची प्रत आणि योजनेशी निगडीत इतर दस्तऐवज. याबाबत सविस्तर माहिती सर्वसाधारण प्रश्नावली मध्ये दिली आहे.
२. योजनेसाठी किती लाभार्थी निवडले जातील?
योजनेसाठी निर्धारित भौतिक व आर्थिक लक्षांकानुसार लाभार्थी निवडले जातील. परिपूर्ण प्राप्त अर्जास प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य या क्रमाने लाभ दिला जाईल.
३. योजनेसाठी लाभाची रक्कम किती असेल?
योजनांतर्गत लाभाची रक्कम संस्थेने कोर्सनिहाय निर्धारित केल्याप्रमाणे राहील. सदर रक्कम IGTR संस्थेस अदा केली जाईल.
४. प्रशिक्षण कोर्सचा सविस्तर तपशील कोठे मिळेल?
प्रशिक्षण कोर्सचा सविस्तर तपशील अमृत व IGTR संस्थेच्या संकेतस्थळावर मिळेल.
५. यापूर्वी IGTR मध्ये कोर्स पूर्ण केला असेल तर लाभाची रक्कम मिळेल का?
नाही.
६. यावर्षी लाभ न मिळाल्यास लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी ठेवली जाते का?
नाही.
७. असाच कोर्स दुसऱ्या एखाद्या संस्थेत केल्यास लाभ मिळेल का?
नाही.
८. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त अर्जदारांना योजनेचा लाभ मिळू शकेल?
होय.
९. अर्जदारास निवड झाल्याचे कसे समजेल?
अमृतच्या www.mahaamrut.gov.org व आय.जी.टी.आर. संस्थेच्या https://www.igtr-aur.org संकेतस्थळावर लाभार्थी यादी प्रसिध्द केली जाईल.
<