संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजना प्रश्नावली
१.या योजनेच्या लाभासाठी शैक्षणिक निकष काय आहेत?
या योजनेसाठी आवश्यक शैक्षणिक निकष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निर्धारित केल्यानुसार किमान १० वी उत्तीर्ण राहतील.
२.एकच उमेदवार एकावेळी टंकलेखन व लघुलेखन या दोन्ही विषयातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यास दोन्ही परीक्षांचा लाभ मिळेल काय?
होय. यामध्ये एका सत्रात जास्तीत जास्त ०२ (दोन) विषय संगणक टंकलेखनासाठी व ०३ (तीन) विषय लघुलेखनासाठी अनुज्ञेय राहतील.
३.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मान्यता प्राप्त राज्यातील विविध नोंदणीकृत शासनमान्य टंकलेखन संस्थांचे व्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये परीक्षा देवून उत्तीर्ण झाल्यास योजनेचा लाभ मिळेल का?
नाही.
<