कृषी क्षेत्रात ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षणाची योजना
योजनेचा उद्देश:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना विशेषत: ग्रामीण क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे.
लाभार्थी लक्षगट:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील जातीचे युवक, युवती
लाभार्थी पात्रता निकष:
1. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.2. प्रशिक्षणार्थी लाभार्थीचे वय: १८ ते ५५ वर्षे दरम्यान असावे.3. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण असावा.4. शेतकरी कुटुंबातील उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.5. अर्जदाराचा नोदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचा फिटनेस दाखला आवश्यक.(वैद्यकीय दाखल्याचा नमुना डाऊनलोड करून वैद्यकीय अधिकारी यांचे स्वाक्षरीनंतर संकेतस्थळावर अपलोड करावा) 6. लाभार्थ्याकडे भारतीय पारपत्र (पासपोर्ट)/वाहन चालक परवाना/शिधा पत्रिका यापैकी उपलब्ध दस्तऐवजाची स्वस्वाक्षरीत प्रत जोडावी,7. उमेदवाराच्या स्वत:च्या आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक खाते क्रमांक, खाते प्रकार, IFSC कोड
लाभासाठी अर्ज करण्याची पध्दत:
अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक अर्जदारांनी विहीत नमुन्यामध्ये विहित मुदतीत अमृतच्या संकेतस्थळावर www.mahaamrut.org.in ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच,
अर्जाची एक हार्डप्रिंट स्वाक्षरीत करून आवश्यक सर्व दस्तऐवज स्वसाक्षांकित करून अमृतच्या कार्यालयास दिलेल्या विहीत मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.
योजने अंतर्गत लाभाचे स्वरूप:
या प्रशिक्षणासाठी अमृत संस्थेने प्रायोजित केलेल्या प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण शुल्क प्रशिक्षण शुल्क रु. ३५०००/- (अक्षरी रुपये पस्तीस हजार फक्त) प्रति प्रशिक्षणार्थी थेट कृषी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी यांना अदा करण्यात येईल.
ज ्या प्रशिक्षणार्थीनी पूर्णवेळ निवासी प्रशिक्षण घेतले असेल त्यांना निवास व भोजनाच्या खर्चासाठी प्रति प्रशिक्षणार्थी रु. ५०००/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) प्रमाणे रक्कम थेट लाभार्थ्यांच्या नावे असलेल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.