C-DAC संस्थेमार्फत माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण योजना
योजनेचा उद्देश:
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या, आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना माहिती तंत्रज्ञान, उच्च कार्यक्षमता संगणक,
ग्रिड आणि क्लाउड संगणक, बहुभाषिक संगणक, व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा,
सर्वव्यापी संगणक प्रशिक्षणाद्वारे उद्योगाभिमुख रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे.
लाभार्थी लक्षगट:
राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळामार्फत अशा योजनांचा लाभ मिळत नाही अशा अमृतच्या लक्षित गटातील जातीचे,
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक, युवती जे सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक असून निश्चित केलेली अर्हता धारण करतात.
लाभार्थी पात्रता निकष:
1. अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
2. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे मर्यादेत असणे आवश्यक.
3. अर्जदार सी-डॅकची C-CAT ही पूर्वचाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
4. अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्याचा तपशील (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) व रद्द केलेला चेक जोडणे आवश्यक आहे.