आर्थिक विकासाकरीता स्वयंरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम योजना एफ ए क्यू
- १. या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
- अमृतच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषात बसणाऱ्या व ज्यांना उद्योग व्यवसायात स्वारस्य आहे असे उमेदवार सहभागी होवू शकतील
- २. प्रशिक्षण कार्यक्रम कोठे राबविले जातील?
- या योजनेतील प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थींच्या संख्येनुरूप जिल्हा/तालुका स्तरावर राबविले जातील.
- ३. या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसायास मदत केली जाईल का?
- या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मार्गदर्शन केले जाईल.
- ४. लाभार्थींना उद्योगासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल का?
- या योजनेत आर्थिक सहाय्याची तरतूद नाही. तथापि, अमृतच्या इतर योजनांतून लाभार्थींना प्राधान्याने लाभ देवून आर्थिक पाठबळ दिले जाईल.
<